बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या मध्यस्तीमुळे शिंदे-ठाकरेंची भेट होणार?, शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ

मुंबई | शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदेनी परत उद्धव ठाकरेंसोबत यावं, अशी विनंती केली होती. उद्धवसाहेबांनी आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवले असून एकनाथ शिंदे यांच्यावतीने प्रवक्ते आणि आमदारांनी उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. ही सर्व घटना शिवसेनेचा भाजपावर असलेल्या हिंदुत्वाच्या विश्वासामुळे घडली असून भाजपाने मोठ्या मनाने मध्यस्ती करावी, असं ट्विट त्यांनी त्यावेळी केलं होतं.

त्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार का ? असा सवाल उपस्थित केला जात होता. आता मात्र पुन्हा दीपाली सय्यद (Deepali Syed) यांच्या एका ट्विटने चर्चेला उधाण आलं आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे व ठाकरे एकमेकांना भेटणार असल्यांची माहिती देली आहे. तसेच मध्यस्थी केल्याबद्दल भाजपचे आभारही मानले आहेत.

येत्या दोन दिवसात आदरणीय ठाकरे साहेब आणि आदरणीय उद्धव साहेब यांनी शिवसेनेच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे ऐकल्यावर बर वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली. उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, असं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे.

दरम्यान, दीपाली सय्यद यांनी याआधीही एक ट्विट केल होत. लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे, शिवसेनेच्या ५० आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील, असा मजकूर त्यांनी लिहिला होता.

थोडक्यात बातम्या

‘…अन् त्यानंतर मी एकदाही उद्धव ठाकरेंशी बोललो नाही’, उदय सामंत स्पष्टच बोलले

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनगड यांना उमेदवारी, शेतकरी पुत्राबद्दल जाणून घ्या सर्वकाही

‘राज्यात हे काय सुरू आहे?’; संजय राऊतांचा थेट राज्यपालांना प्रश्न

“शिंदे यांच्याबद्दल आदरच, पण आमच्या मनातील मुख्यमंत्री तुम्हीच”

डायबिटीस असणाऱ्या पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More