बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा बंगला सोडायला लावणाऱ्यांना माफ करणार नाही”

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात होत असलेल्या घडामोडीमुळे राजकारणाला नाट्यमय स्वरूप प्राप्त झालं आहे. मुख्यमत्र्यांना वर्षा बंगला सोडायला भाग पाडलं यासगळ्यासाठी शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाहीत, असं वक्तव्य सतीश शिंदे (Satish Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर अचानक गायब झाले. त्यांच्यासोबत 50 आमदार ही आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करत आहोत. हे लोक आमच्या कष्टामुळे आमदार झाले. ते शिवसेनेशी गद्दारी करत आहेत त्यांना चांगलाच धडा शिकवू, असंही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी सेनेशी गद्दारी केली. सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेशी बंड केलं. भाजपसोबत घरोबा केला. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांना सत्तेचा माज आला आहे, असं वक्तव्य शिवसेना तालुकाध्यक्ष सतीश शिंदे यांनी केलं.

दरम्यान, काम रात्री फेसबुकच्या माध्यमातून लाइव्ह येत वर्षा बंगला सोडणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. काल रात्री उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडून मातोश्रीला रवाना झाले.

थोडक्यात बातम्या

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल माझ्या मनात आणखी आदर वाढला”

“आमचा विठ्ठल चांगला आहे, त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला घेरलंय”

“…म्हणून आता आमच्यासोबत येत आहेत एकनाथ शिंदे”

शिवसेेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना!

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More