विंग कमांडर अभिनंदन यांचा स्वातंत्र्यदिनी ‘वीरचक्र’ने गौरव होणार!

नवी दिल्ली |  विंग कमांडर अभिनंदन यांना ‘वीर चक्र’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या f-16 या लढाऊ विमानाचा वेध घेत त्यांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यांच्या याच साहसाबद्दल केंद्र सरकार त्यांना ‘वीरचक्र’ने गौरवणार आहे. वीरचक्र हा तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे.

पाकिस्तानमधील बालाकोटच्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक केला होता. यावेळी निर्माण झालेल्या तणावात अभिनंदन यांनी पाकिस्तानचं F 16 विमान पाडलं होतं.

दहशतवाद्यांच्या तळावर बॉम्बहल्ले करणाऱ्या मिराज 2000च्या वैमानिकांचाही वायुसेनेचं पदक देऊन गौरव होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वीर चक्र’ हे पदक युद्धावेळी वीरता दाखवणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या जवानांना प्रदान केलं जातं.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; मांडणार पूरग्रस्तांच्या व्यथा

-राज ठाकरेंच्या ‘होम मिनिस्टर’ पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर!

-“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत… फडणवीस की येडीयुरप्पा???”

पूरग्रस्तांच्या मदतीला उर्मिला मातोंडकर कोल्हापूर-सांगलीत!

-पूरग्रस्तांच्या मदतीला क्रिकेटचा ‘देव’ धावला! इतरांनाही मदत करण्याचं आवाहन