बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज मुंबई-हैदराबाद आमने-सामने; सलग पराभवाचा सामना करणाऱ्या हैदराबादला पहिल्या विजयाची आशा

चेन्नई | आयपीएल हंगामातील 9वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. चेन्नईच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. हैदराबादला या हंगामात एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे हा सामना जिंकून पहिला विजय सकारण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल.

मागील सामन्यात मुंबईने कोलकाता विरुद्ध मोक्याच्या क्षणी सामना फिरवून विजय मिळवला होता. मुंबईचा संघ सर्व संघांपैकी सर्वात तगडा संघ मानला जात आहे. कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव तसेच संघातील इतर खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. तर मुंबईकडे बोल्ट आणि बुमराह हे जागतिक दर्जाचे 2 महत्वाचे गोलंदाज आहेत. मुंबईचा संघ कमी धावसंख्या झाल्या तरी सामना खेचून आणण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे या सामन्यात मुंबईच पारडं जड मानलं जात आहे.

तर दुसरीकडे हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वोर्नरने आणखी आपले हात खोलले नाहीत. त्याला मागील दोन सामन्यात चांगली सुरूवात भेटून सुद्धा मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तर मनीष पांडे चांगली खेळी करत आहे. पण त्यानंतर कोणतेच फलंदाज हैदराबादसाठी मोठी खेळी करू शकले नाहीत. गोलंदाजीच्या बाबतीत राशिद खान हैदराबादसाठी महत्वाचा फिरकीपटू आहे. संघाला गरज असेल तेव्हा तो विकेट मिळवून देण्याची तो क्षमता ठेवतो. तर टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार यांच्या खांद्यावर देखील आज महत्वाची जबाबदारी असणार आहे.

दरम्यान, चेन्नईच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठी धावसंख्या होऊ शकते. पण दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्यांना अडचण येई शकतात. काही काळानंतर ही धावपट्टी हळूवार होऊन जाते. त्यामुळे जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजी घेण्याचा प्रयत्न करेल.

थोडक्यात बातम्या-

मराठी चित्रपट चालत नाहीत याला मराठी प्रेक्षकच जबाबदार; प्रसाद ओक संतापला

कोरोना झाला, दिवसभर फिरुनही बेड मिळाला नाही; पुण्यातील महिलेची आत्महत्या

करण जोहरनं कार्तिक आर्यनला सिनेमातून काढलं, यापुढेही काम देणार नाही?

पत्नीचं दुसऱ्याशी अफेअर, पती ढसाढसा रडला अन् उचललं धक्कादायक पाऊल

कोरोना काळात ‘गरिबांचा मसीहा’ बनलेल्या सोनू सूदलाही कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More