बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशन: देवेंद्र फडणवीसांची ‘ही’ मागणी अजित पवारांनी केली मान्य

मुंबई | विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter session) आजपासून सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून अधिवेशनावरून राजकारण तापल्याच पाहायला मिळतं होतं. मात्र आज अखेर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

विधानपरिषदेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या परिचयाने विधानसभेच्या कामाकाजाला सुरूवात झाली. लगेचचं देवेद्र फडणवीसांनी कामकाज पत्रिकेवरून सरकारला प्रश्न विचारला. सदस्यांनी बिले वाचायची नाहीत ही कुठली पद्धत आहे? एक दिवसाचे अधिवेशन होते. त्यावेळी हे मान्य होते. परंतू पाच दिवसाच्या अधिवेशनात हे योग्य आहे का? अशा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी घेण्याची मागणी केली. बिले महत्त्वाची आहेत. आम्हाला ती वाचायची आहेत, असं सांगत फडणवीसांनी ही मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित(Ajit Pawar) पवारांनीही फडणवीसांचीं मागणी मान्य केली. “सरकारचीही हिच भूमिका आहे. कामकाजपत्रिकेनुसार सर्व काम होईल” असं उत्तर त्यांनी दिलं.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षानं राज्य  सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. ओबीसी आरक्षण, एसटी विलीनीकरण यासांरख्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विधानसभेत ‘इतके’ जण कोरोना पॉझिटीव्ह

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, विधान भवनाच्या बाहेर घोषणाबाजी

Omicron: विनामास्क वाहन चालवणं महागात पडणार; होणार ‘ही’ मोठी कारवाई

हिवाळी अधिवेशन: “…आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?” अजित पवार संतापले

धक्कादायक! कडाक्याच्या थंडीमुळे ‘या’ ठिकाणी 5 जणांचा मृत्यू?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More