बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विधानसभेत ‘इतके’ जण कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या मुद्द्यावरून राजकारण रंगलेलं असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत 10 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे सध्या एकच खळबळ माजली आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी आरोग्य विभागाकडून विधानसभेतील 3500 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये 8 पोलीस आणि 2 अधिवेशनातील कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आता यापैकी कोणाला ओमिक्रॉनी लागण झाली आहे का? याची चाचणी लवकर करण्यात येणार आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील कर्मचांऱ्याची RT-PCR  चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने चिंता निर्माण झाली होती. मात्र, अद्याप या कर्मचाऱ्यांच्या नमुण्यांचं जिनोम सिक्वेंसिगं झालेलं नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे का? हे समजू शकलं नाही.

दरम्यान, अधिवेशन सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. अधिवेशानात पेपरफुटी प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकारला जवाब विचारत त्यांनी निशाणा साधला आहे. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 10 कर्मचारी पॉझिटीव्ह आढळल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेनेला लढण्यासाठी तपास यंत्रणांची ‘चिलखते’ घालावी लागत नाहीत”

हिवाळी अधिवेशन: विरोधकांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारची रणनीती, घेतली आमदारांची बैठक

हिवाळी अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास नको म्हणून प्रशासन लागलं कामाला, केली ‘ही’ जोरदार तयारी

हिवाळी अधिवेशनापूर्वी नाना पटोले थेट दिल्लीत, राजकीय हालचालींना वेग

गुंतवणुकदारांना दिलासा; LIC IPO बाबत मोदी सरकारकडून महत्वाची अपडेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More