बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशन: ‘तुम्हाला एकतरी परिक्षा घोटाळ्याशिवाय घेता येते का?’; फडणवीस कडाडले

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशन सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis) राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी अधिवेशानात पेपरफुटी प्रकरणावरून राज्य सरकारला जबाब विचारत निशाणा साधला आहे.

“अगोदरच्या 4 कंपन्यांना दिलेले कंत्राट रद्द करून न्यासालाच कंत्राट का दिलं? एकतरी परिक्षा तुम्हाला घोटाळ्याशिवाय घेता येते का?, परिक्षा केंद्राबाबत इतका गोंधळ का? आणि सरकारसंबधित अधिकाऱ्यांच्या ड्रायव्हरकडे यातील प्रश्नपत्रिका कशी सापडली?”, असे प्रश्न विचारून फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

“माजी आमदारकडे ध्वनीफित आहे. एका एका पदासाठी किती बोली लागली याची माहिती आहे. 4 लाख 61 हजार अर्ज प्राप्त झाले होते. क गटाच्या पदासाठी 15 लाख तर ड गटाच्या पदासाठी 8 लाखांची बोली लागली होती. अमरावतीत 200 जणांची बोगस नियुक्ती करण्यात आली होती,” असे अनेक गंभीर आरोपही यावेळी फडणवीसांनी केले आहेत.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षानं राज्य  सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. ओबीसी आरक्षण, एसटी विलीनीकरण यासांरख्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विधानसभेत ‘इतके’ जण कोरोना पॉझिटीव्ह

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, विधान भवनाच्या बाहेर घोषणाबाजी

Omicron: विनामास्क वाहन चालवणं महागात पडणार; होणार ‘ही’ मोठी कारवाई

हिवाळी अधिवेशन: “…आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?” अजित पवार संतापले

धक्कादायक! कडाक्याच्या थंडीमुळे ‘या’ ठिकाणी 5 जणांचा मृत्यू?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More