बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविना?, महाविकास आघाडीला ‘या’ गोष्टीची भीती

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची निवडच करण्यात आली नाही. तसेच यापुर्वी हंगामी अध्यक्ष बसवून महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन पार पडलं. त्यात मोठा गोँधळ निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आगामी अधिवेशनात आता अध्यक्ष असणार का?, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

आगामी हिवाळी अधिवेशन हे आता अध्यक्षांविनाच पार पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण यापुर्वी कोरोना संकट आणि आमदारांची कमी संख्या हा मुद्दा लक्षात घेऊन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली होती. त्यातच आता महाविकास आघाडीसमोर आमदार फुटण्याची भीती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

आमदारफुटीच्या भीतीमुळे आता महाविकास आघाडी आवाजी मतदानापेक्षा हात उचलून मतदान करण्यासंदर्भात कायदा करून तो सभागृहात पारीत केल्यानंतरच आता अध्यक्ष निवडीची प्रक्रीया पार पडेल, असं चित्र पाहायला मिळत आहे. परंतू विरोधक या गोष्टीला कितपत समर्थन देणार आणि असा कायदा पारीत होऊ देणार का?, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाला येेणाऱ्या आमदारांच्या स्विय सहाय्यकांना विधीमंडळ परिसरात प्रवेश असणार नाही. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या पत्रकारांनाही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे.

थोडक्यात बातम्या

“…तोपर्यंत समीर वानखेडे यांनी राजीनामा द्वावा”

एनसीबीमधील ‘Special-26’चा खुलासा होणार; नवाब मलिक लवकरच करणार नवा गौप्यस्फोट

WANTED! किरण गोसावीच्या अडचणी वाढल्या, पुणे पोलिसांनी उचललं ‘हे’ पाऊल

पुण्यातील ‘हा’ गंभीर मुद्दा गेला थेट नितीन गडकरींच्या दरबारी; महापौर भेटीसाठी जाणार दिल्लीला

“आर्यन खान प्रकरणात ते सगळे ड्रामा बघत आहे”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More