Top News देश

दिल्लीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द!

नवी दिल्ली | संसदेचे हिवाळी अधिवेशन यावेळी होणार नाही. दिल्लीत कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

जानेवारी,फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात होणार असल्याची माहिती संसदीय संसदीय कार्यालयाकडून देण्यात आलीय.

नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात हिवाळी अधिवेशन होणार होते. परंतु, यावेळी कोरोना संक्रमणामुळे अधिवेशन होणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबतच हिवाळी अधिवेशन होणार आहे.

सप्टेंबरमध्ये संसेदेचे पावसाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत सदस्यांची आसनव्यवस्था लोकसभा आणि राज्यसभा या सदनामध्ये करण्यात आली होती. मात्र यावेळी अनेक संसद सदस्य आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते.

महत्वाच्या बातम्या-

“बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं पण…”

सांगितलं होतं पवारांचा नाद करू नका, पण..- धनंजय मुंडे

शहीद जवान संग्राम पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरात दाखल

“पक्षात कुणालाही कोणतंही पद मिळतं, फाईव्ह स्टार कल्चरने निवडणुका जिंकता येत नाहीत”

गोव्यात समविचारी पक्षांशी युतीची तयारी- प्रफुल्ल पटेल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या