Top News कोरोना राजकारण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द!

नवी दिल्ली | संपूर्ण देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातलंय. या कोरोनाच्या परिस्थितीत संसदेचं अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रसाक टाळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्याकरता अनुकूलता दर्शवलीये. त्यामुळे थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.

कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी संसदेचं हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केलेली. यावर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधीररंजन चौधरी यांना पत्र पाठवत जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असल्याचं सांगितलंय.

हिवाळयाचे महिने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली असता कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन बोलवू नये यावर एकमत झालंय, असंही जोशी यांनी पत्रात नमूद केलंय.

थोडक्यात बातम्या-

‘भारतात फेसबुकवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण’; राहुल गाधींचा गंभीर आरोप

“अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही”

“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं थांबवावं”

वर्षेभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतेय हे उघड झालंच ना?- आशिष शेलार

“शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवळाची चिंता करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या