बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास नको म्हणून प्रशासन लागलं कामाला, केली ‘ही’ जोरदार तयारी

मुंबई | यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) आजपासून सुरूवात होत आहे. राज्यातील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) हजेरी लावणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली होती.

उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचा त्रास असल्याने प्रशासनाला जाग आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास होऊ नये यासाठी रस्ते गुळगुळीत करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचं शासकिय निवासस्थान असलेला वर्षा बंगला ते विधान भवन मार्गावरील काही किलोमीटर पर्यंतचा रस्ता चकाचक करण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्डे, स्पीडब्रेकरमुळे मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास होऊ शकतो यामुळे प्रशासनाने हा रस्ता साफ करून घेतला आहे.

दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहाणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या मणक्याचा आणि मानेच्या स्नायूचा त्रास वाढल्याने प्रशासनाने मुख्यमंत्र्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी रस्ता गुळगुळीत केला आहे.

थोडक्यात बातम्या-

गुंतवणुकदारांना दिलासा; LIC IPO बाबत मोदी सरकारकडून महत्वाची अपडेट

‘नाद नाय करायचा राजेंचा’ भर कार्यक्रमात पुन्हा एकदा कॉलर उडवत केला डान्स

MPSC Exam: इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; राज्य सरकारमध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी मेगाभरती सुरू

‘…म्हणून दारु दर कमी केले’; अजित पवारांनी सांगितलं कारण

‘महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More