बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशन: विरोधकांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारची रणनीती, घेतली आमदारांची बैठक

मुंबई | आजपासून महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Winter Assembly Session) सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक महाविकास आघाडी सरकारच्या( MVA) विरोधात आक्रमक पवित्रा घेणार आहेत. ओबीसी आरक्षण, परीक्षांमधील गोंधळ, एसटी संप, पीक विम्याची रक्कम न मिळणे, पीक विम्याची रक्कम न मिळणे, अशा अनेक मुद्द्यावरुन विरोधी सरकार सत्ताधारी सरकारला घेरणार आहे.

हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी रणनिती आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज अधिवेशनापूर्वी सत्ताधारी पक्षाची बैठक होत आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांची अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ही बैठक होत आहे. त्यामुळे सगळ्याचं लक्ष सध्या त्यांच्या बैठकीकडे लागले आहे.

विरोधकांची आक्रमकता सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर पाहायला मिळणार आहे. आधीच नागपूरमध्ये न होणारे हिवाळी अधिवेशन आणि अधिवेशनाचा कमी कालावधी यामुळे विरोधक आक्रमक आहेत. त्यातच ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजप (bjp) आणि महाविकास आघाडीचे (MVA) नेते आता आमनेसामने येणार आहे. त्यामुळे या पाच दिवसांच्या अधिवेशनात काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या – 

हिवाळी अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास नको म्हणून प्रशासन लागलं कामाला, केली ‘ही’ जोरदार तयारी

हिवाळी अधिवेशनापूर्वी नाना पटोले थेट दिल्लीत, राजकीय हालचालींना वेग

गुंतवणुकदारांना दिलासा; LIC IPO बाबत मोदी सरकारकडून महत्वाची अपडेट

‘नाद नाय करायचा राजेंचा’ भर कार्यक्रमात पुन्हा एकदा कॉलर उडवत केला डान्स

MPSC Exam: इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; राज्य सरकारमध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी मेगाभरती सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More