मुंबई | राज्य विधीमंडळाचे हिवाळी आधिवेशन येत्या 14 आणि 15 डिसेंबरला होणार आहे. कोरोनाची परिस्थीती लक्षात घेता हे आधिवेशन दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधान भवनात यासंदर्भात बैठक होती.
या दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात श्रद्धांजली कार्यक्रम, शोकप्रस्ताव आणि पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. तसेच हिवाळी अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय विधानमंडळाने घेतला आहे.
दरम्यान, 12 आणि 13 डिसेंबर रोजी विधानभवन परिसरात तपासणी शिबीर घेतले जाईल. या अधिवेशनासाठी येणाऱ्या दोन्ही सभागृहातील आमदारांसह विधानभवन आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘हिंमत असेल तर एकएकटे लढा’; सत्ताधाऱ्यांना आव्हान देणाऱ्या पाटलांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले…
‘चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा’; विजयी उमेदवार अरूण लाड यांचा टोला
आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे- शरद पवार
‘आत्महत्या करणारे शेतकरी भेकड’; कर्नाटकच्या कृषीमंत्र्यांचं संतापजनक वक्तव्य
“…हे मुख्यमंत्र्यांचं कौतुक की अब्रू काढणं हे अजित पवार सांगू शकतात”