बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Winter: हिवाळ्यात ठणठणीत रहा; आहारात करा ‘या’ 6 पदार्थांचा समावेश

मुंबई | परतीच्या पावसाने आता काही ठिकाणी विश्रांती घेतल्याने आता राज्यातील अनेक भागात थंडीचं (Winter) आगमन झालं आहे. त्यामुळे आता स्वेटर (Sweaters), कानटोप्या आणि गल्बज बाहेर निघू लागले आहेत. ऋतू बदलला की अनेकांना त्रास जाणवू लागतो. तर काहींना हिवाळ्यात अनेक आजाराला सामोरं जावं लागतं. अशातच आता अचानक बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेकजण आजारी (Sick in Winter) पडल्याचं दिसत आहे.

हिवाळ्यात अनेकांना आजारपणाला सामोरं जावं लागलं. हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती (Immunity) देखील कमी होते. त्यामुळे योग्य आहार घेणं गरजेचं आहे. हिवाळ्यात शरिराला उब देणारे पदार्थ खालल्याने फायदा होतो. आक्रोड (Walnut) आणि बदाम (Almonds) खाणं हे शरिरासाठी फायद्याचं ठरतं. त्याचबरोबर आवळा खाल्ल्याने शरिरातील Vitamin Cचं प्रमाण देखील वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा फायदा होतो.

धगधगत्या जीवनात गुळ (Jaggery) हा अत्यंत प्रभावी पदार्थ मानला जातो. गुळ खाल्ल्याने शरिरातील उष्णता वाढण्यास मदत होते. तसेच तुपाचा (Ghee) वापर दररोजच्या आहारात केल्याने आरोग्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे हिवाळ्यात त्वचा देखील कोरडी होत नाही.

दरम्यान, रताळ्याचा (sweet potato) आहार समावेश असणं आवश्यक आहे. रताळ्याला सुपरफुडचा दर्जा दिला जातो. रताळं खालल्याने शरिरातील थंडी कमी होण्यास मदत होते. त्यामध्ये Vitamin A, Potassium, Fiber चं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्याचबरोबर खजुर (Date palm) देखील हिवाळ्यात शरिरासाठी फादयेशीर ठरतं.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसला ना इज्जत ना किंमत, झुकायचं की नाक घासायचंय हा…”

…अन् ‘त्या’ घटनेनंतर खासदारानं वाटले चक्क ‘चाॅकलेट आणि आंब्याचे पापड’

‘Sharad Pawar युपीएचे नेते होणार का?’, ममता बॅनर्जी म्हणतात…

“ठाकरे सरकार अपशकुनी, फडणवीस सरकारनं मिळवलेलं Maratha Reservation घालवलं”

IPL Retention: कहीं खुशी कहीं गम, वाचा रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More