महाराष्ट्र मुंबई

कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर …- उद्धव ठाकरे

मुंबई | नविन वर्षाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला वैयक्तिक आरोग्यासोबतच इतरांच्याही आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहान केलं आहे.

नववर्षाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी कोरोना काळ आणि येणाऱ्या भविष्यात आपलं वर्तन कसं असावं हे त्यांनी सांगितलंय.

आपण पुनश्च: हरी ओम म्हणत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आता स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला. पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनिशी लढणार- चंद्रकांत पाटील

कोरेगाव भीमाला जाणारच, प्रसंगी न्यायालयात जाऊ- चंद्रशेखर आझाद

समुद्रातील कार जेसीबीनं बाहेर काढली; वाचा नेमकं काय घडलं होतं

‘….तोपर्यंत नव्या वर्षांचं सेलिब्रेशन नाही’; आंदोलक शेतकरी आक्रमक

पीडित मुलीला न्याय देणार का पवार साहेब?’; मेहबूब शेख यांच्या प्रकरणावरून राणेंचा थेट पवारांना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या