सांगली | महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सक्षम असून राष्ट्रवादीचा प्रस्ताव आला आहे, त्याबद्दल स्थानिक नेते विचार करत आहेत, जर तसं जमलं नाही तर काँग्रेस स्वबळावर लढण्यास तयार आहे, असं काँग्रेसचे नेते विश्वजित कदम म्हणाले.
जे सक्षम उमेदवार आहेत आणि पक्षाशी निष्ठा ठेवून काम करत आहेत अशाच उमेदवारांना याठिकाणी काँग्रेस पक्ष संधी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत त्यामुळे यात राष्ट्रवादी-काँग्रेसची युती होणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-शत्रुघ्न सिन्हांचा मोदीवर हल्लाबोल; पोस्टर-बॅनर्स लावूनच गाजावाजा केला!
-…म्हणून आम्हाला कर्नाटकमध्ये अपयश आलं- येडीयुरप्पा
-विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी जाहिर
-… तर एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही- राजू शेट्टी
-राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हत्येचा कट फसला; काँग्रेसचा नगरसेवक फरार!