बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्रासोबत आता अजिंक्य रहाणे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, पाहा काय आहे प्रकरण

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस येऊ लागल्या आहेत. राज कुंद्राला अटक झाल्यापासून सोशल मीडियावर नेटकरी त्याच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत. एकिकडे नेटकऱ्यांनी राज कुंद्राला धारेवर धरलं असताना दुसरीकडे भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य राहणे देखील नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

अजिंक्य राहाणेचं एक जुनं ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. 19 ऑक्टोबर 2012 रोजी अजिंक्यने राज कुंद्राला टॅग करत एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये अजिंक्यने राज कुंद्राची स्तुती करताना सर तुम्ही उत्तम काम करत आहात, असं म्हटलं होतं. यानंतर अजिंक्यला उत्तर देताना राजने धन्यवाद, असं म्हटलं होतं.

अजिंक्य राहणेनं राज कुंद्राचं कौतुक करणारं ट्वीट केल्यानं राहणे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. 2012 मध्ये अजिंक्यने राज कुंद्राची स्तुती केली होती. त्यावेळी राज कुंद्रा आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा सह-मालक होता.

दरम्यान, याप्रकरणी राज कुंद्राविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. राजविरूद्ध पुरेसे पुरावे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. राज कुंद्राने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये तब्बल 8 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या – 

पोर्नोग्राफी प्रकरणी नवऱ्याला अटक झाल्यावर शिल्पाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“सरकार चालवता येत नाही म्हणून सर ‘कार’ चालवतात”

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या 100 दिवसातील सर्वात कमी रूग्णसंख्येची नोंद

सैराटच्या आर्चीचं काळीज कुणी चोरलं?, पाहा नेमकं काय म्हणतेय…

हॉटेल, घरं भाड्यानं घेऊन पॉर्न शुटिंग, राज कुंद्राच्या रॅकेटची सर्व माहिती उघड

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More