बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आयपीएल’ सुरू होण्यास फक्त 6 दिवस शिल्लक असताना; ‘या’ मैदानात खेळाडूंच्या आधी कोरोनाची ‘एन्ट्री’

मुंबई | ‘आयपीएल’ च्या 14व्या हंगामाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या वर्षी कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशातील 6 शहरात सामन्याचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. कोरोनाच्या धोक्यामुळेच गेल्या वर्षी ही स्पर्धा युएईमध्ये भरवण्यात आली होती. पण जगातील सर्वात श्रीमंत स्पर्धा सुरू होण्याआधी कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत.

‘आयपीएल’चे आयोजन करणाऱ्या ‘बीसीसीआय’ला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत दोघा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पण यापेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबईतील वानखेडे मैदानावरील 8 ग्राउंड स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. या मैदानावर 10 ते 25 या कालावधीत आयपीएलच्या 10 सामन्यांचे आयोजन होणार आहे.

‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार वानखेडे मैदानावरील 19 ग्राऊंड स्टाफची आरटी-पीसीआर टेस्ट गेल्या आठवड्यात घेण्यात आली होती. यापैकी तिघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. तर 1 एप्रिला 5 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. पहिल्या टप्प्यात पॉझिटिव्ह आढळलेले ग्राऊंड स्टाफला इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले होती की नाही याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. ‘आयपीएल’ सुरू होण्यास फक्त 6 दिवस शिल्लक राहिले असताना कोरोनाची प्रकरणे समोर येत असल्याने ‘बीसीसीआय’ची चिंता वाढली आहे.

दरम्यान, स्पर्धा सुरू होण्याआधी प्रथम कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा आणि आज दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सर्वाधिक संख्या महाराष्ट्र आणि मुंबईत आहेत.

थोडक्यात बातम्या –

हळद उतरली नाही तोच वाहिला रक्ताचा पाट, रक्तरंजीत घटनेनं सोलापूर हादरलं!

उद्धव ठाकरेजी, थोडा अभ्यास करत जा! चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंंत्र्यांना टोला

‘काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे’; पुण्यातील मिनी लॉकडाऊनला भाजपचा कडाडून विरोध

रुग्णसंख्या वाढली, कोरोना बळीही वाढले, कोरोनाचा कहर; ‘या’ देशात संपूर्ण लाॅकडाऊन घोषित

“…तर 30 एप्रिलपर्यंत कोरोनाची साखळी तोडणं शक्य आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More