बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छोटू भोयर काँग्रेसवर नाराज? म्हणतात, “…यासाठी मी काँग्रेसमध्ये आलो नव्हतो”

नागपूर | विधानपरिषद निवडणुकीची तयारी रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यातच नागपूरमधून काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. मतदानासाठी काहीच तास शिल्लक असताना काँग्रेसला उमेदवार बदललण्याची वेळ आली आहे. छोटू भोयर यांनी असमर्थता दर्शविल्याने काँग्रेसला ऐन मतदानाच्या  वेळेला उमेदवार बदलावा लागला आहे.

याबाबत छोटू भोर यांनी सांगितलं, निवडणुक लढवण्यासाठी मी असमर्थता दर्शविली नाही. काँग्रसने पक्षकारात मी असमर्थता दर्शविल्याचं म्हटलंय. पण जर काँग्रेसला वाटत असेल की ही निवडणूक छोटू भोयर यांच्या नावावर जिकूं शकत नाही. त्यामुळे जर त्यांनी उमेदवार बदलला असेल तर त्यांच्या निर्णयाचा मी स्वीकार करतो. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये आलो नव्हतो, असंही त्यांनी बोलून दाखवलं.

छोटू भोयर यांनी मंगेश देशमुख निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही  सांगितलं आहे. ते म्हणाले, मंगेश देशमुखांच्या विजयासाठी मी जे जे काही करू शकतो, ते या 12 तासात करेन. मात्र पक्षाने अस का केलं त्याचं कारण आता प्रदेशाध्यक्षांशी बोलूनच सांगेन, असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

दरम्यान, मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रसने उमेदवार बदलला आहे. काँग्रेसनं आता अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठींबा जाहिर केला आहे. छोटू भोयर यांनी असमर्थता दर्शविल्याचं सागंत काँग्रेसनं मंगेश देशमुख यांना पाठींबा दिला आहे. पण छोटू भोयर यांनी मी असमर्थता दर्शवली नसल्याचं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माझ्यावरचे ‘ते’ आरोप बिनबुडाचे’, कंगनाची उच्च न्यायालयात धाव

बर्ड फ्लूचं सावट; सरकारनं दिले बदक आणि कोंबड्या मारण्याचे आदेश

“बाबरीच्या निकालानंतर आम्ही पार्टी केली, वाईनची बॉटल घेतली आणि…”

नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार म्हणतात…

कोरोना अपडेट! राज्याच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More