रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

परभणी | केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मोठं वक्तव्य केलंय. यामुळे राजकीय वर्तळात खळबळ माजली आहे. आपण एकटेच आहोत, असं समजा उद्या निवडणुका आहेत असं समजून कामाला लागा, असं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलं आहे. ते परभणीत एका कार्यक्रमात बोलत होते.

भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून रावसाहेब दानवे म्हणाले, भाजप वाढली नाही, कारण की पंचवीस तीस वर्ष आमच्या बापाला लढायला भेटलं नाही. ना झेडपी, ना पंचायत समिती, ना आमदारकी ना खासदारकी, तर पक्ष वाढेल कसा?, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

आम्ही ज्या दिवशी निवडून येतो त्या दिवसापासून पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागतो. म्हणून नेहमी नेहमी आम्ही निवडून येतो, असंही दानवेंनी यावेळी सांगितलं आहे.

जादू झाली, आमचं सरकार आलं; तसंच उद्या काहीही होऊ शकतं असं विधान रावसाहेब दानवेंनी केलं. परंतु, कन्नडच्या सभेत आपण केलेल्या या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आल्याचं आता दानवे म्हणाले.

मी सरकार कोसळण्याबाबत नव्हे तर ठाकरेंचे आमदार आमच्यात येण्याबाबत बोललो असं दानवेंनी म्हटलं. उद्या काहीही होऊ शकतं म्हणजे ठाकरेंचे बाकीचे आमदार आमच्यात येऊ शकतात, असं दानवे म्हणाले.

आमच्या संपर्कात कोण-कोण आहेत हे चॅनलसमोर सांगता येणार नाही, असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. यामुळे आता अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-