बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“निवडणुका जवळ आल्याने दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला”

नाशिक | त्रिपुरामध्ये झालेल्या कथित हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जाळपोळ, दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. अनेक शहरात हिंसक परिस्थिती निर्माण झाल्याने 144 कलम लागू करून जमावबंदी देखील जाहीर करण्यात आली होती.

याच मुदद्यावरून शरद पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, त्रिपुरात जे काही घडलं. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचा काही संबंध नाही. परंतु उत्तर प्रदेशसह तीन राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. ते डोळ्यासमोर ठेवूनच या दंगली घडवल्या जात आहेत. असा घणाघात त्यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, काही अशा संघटना आहेत. त्या निमित्त शोधून रस्त्यावर येतात. अशा लोकांबाबत प्रत्येकाने विचार करायला हवा. असा इशारा देत ते पुढे म्हणाले, राज्य शांततेत वाटचाल करीत असताना त्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून केला जात आहे. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

पवार नाशिकमध्ये एका कार्यक्रमानिमीत्त गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नक्षलवाद, विक्रम गोखले यांचं वादग्रस्त वक्तव्य यांसारख्या अनेक विषयावर त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

तुम्ही आधी तुरूंगातील जेवण घ्या’; अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका

‘हे’ राज्य पुन्हा एकदा लाॅकडाऊनसाठी सज्ज, न्यायालयात स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणून घ्या ताजी आकडेवारी

“एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायेत, हे दुर्दैव आहे”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More