जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने देवेंद्र फडणवीस आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेणार???
सोलापूर | पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांचे सुपूत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपनेही समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले तर दोन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्षही पंढपुरमध्ये उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने या निवणुकीमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथांना आशीर्वाद आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी आली आहे, भाजपचा कुठेही विजय झालेला नाही. सगळे एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच काहींनी भाजपची उमेदवारी घेतली नाही. फडणवीसांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याने चर्चाँणा उधाण आलं आहे. पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी विजयाची हॅट्रीक करणारे स्व. आमदार भारत नाना भालकेंची आठवण काढत गड आला पण सिंह गेला, असे उदगार काढले.
दरम्यान, एखाद्या कामासाठी किती चिकाटी असावी हे भारत भालके यांच्याकडून पाहायला मिळालं. आमचं अस झालं. गड आला पण सिंह गेला. कारखान्यांचे प्रश्न मार्गी लागले पण नाना राहिले नाही. 35 गावांच्या पिण्याचा पाण्यासाठी त्यांनी खूप आग्रह धरला. प्रसंगी आमच्यासमोर अधिकाऱ्यांना दमदाटी केली. नानांचा विचार पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भगीरथ भालकेंना संधी दिली, असं जयंत पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘कोरोनाचं संक्रमण वुहानच्या प्रयोगशाळेतून नव्हे तर…’; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक दावा
शितल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यास सायबर तज्ज्ञांना अपयश; आत्महत्येमागचं गुढ कायम
संजय राऊत मोठे नेते, सरकार स्थापनेत त्यांचं योगदान आहे पण…- बाळासाहेब थोरात
धाडसी अंगरक्षकाने पोलीस अधीक्षकांवर होणारा तलवारीचा वार अंगावर झेलला!
“पवार साहेब, शेतकरी विरोधात काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवा, वेळ मिळाल्यास आमच्याकडेही लक्ष द्या”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.