‘…माझा त्याला पाठिंबा आहे’; भाजपचा बडा नेता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेना (Shivsena) पक्षाविषयी आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा आणि पक्षपाती असल्याने हा आयोग बरखास्त केला पाहिजे. प्रत्यक्ष निवडणुका घेऊनच आयुक्त आणि आयोग नेमला पाहिजे, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या या मागणीला चक्क भाजपच्या (Bjp) बड्या नेत्याने पाठिंबा दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanyam Swami) यांनी ट्विट करत ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.

निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण आयोगाचे कामकाज संशयास्पद आहे, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपले पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं जात आहे. आता सोमवारी ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, की निवडणूक आयोगाने एवढे शपथपत्र, प्रतिज्ञापत्र मागितले. एवढे गठ्ठे दिले. पण त्यानंतर आयोग जर आमदार खासदारांच्या संख्येवर निर्णय देत असतील तर योग्य नाही.

महत्त्वाच्या बातम्या-