बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! ‘हा’ अपवाद वगळता प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही

मुंबई | गावी जाण्यासाठी ई-पासची गरज भासत होती. मात्र आता येत्या सोमवारपासून ई-पासची गरज भासणार नाही. 23 मार्चपासून सुरू केलेला लॉकडाऊनमध्ये प्रवासासाठी आवश्‍यक केलेल्या ई-पास आता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नागरीकांना जिल्हाअंतर्गत प्रवास करण्यास मुभा असणार आहे.

केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वीच ई-पास रद्द केल्याबाबतचा आदेश काढला होता. मात्र राज्य सरकारने राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ई-पासला रद्द करण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र नागरिकांच्या सततच्या मागणीवरून राज्य सरकाडरने नवीन नियमावलीत ई-पास रद्द कऱण्यात आला आहे. मात्र याला एक अपवाद आहे.

अनलॉकच्या गटनिहाय जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार फक्त पाचव्या गटातील भागात ई- पास बंधनकारक असेल. म्हणजेच पाचव्या गटातील कुठल्याही भागात तुम्हाला थांबायचं असेल तर तुमच्याकडे ई-पास असणं गरजेचं असणार आहे. मात्र सध्यातरी राज्यातील कोणतंही शहर पाचव्या गटात नाही त्यामुळे आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची गरज भासणार नाही.

दरम्यान, अत्यावश्‍यक कारणासाठी प्रवास करण्याची गरज असणाऱ्या नागरीकांसाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. नागरीकांना वैद्यकीय व कुटुंबातील सदस्याचा मृत्यु या दोन कारणांसा प्रवासाला परवानगी दिली जात होती.

थोडक्यात बातम्या- 

‘नियमांचं तातडीनं पालन करा अन्यथा…,’; केंद्र सरकारचा इशारा

कौतुकास्पद! सर्दी-खोकल्याची लक्षणं दिसल्यानं 3 वर्षाची चिमुकली एकटीच गेली डाॅक्टरकडे

ऑलम्पिकमध्ये खेळाडूंना मिळणार 1 लाख 60 हजार कंडोम पण या कारणामुळे ते वापरू शकणार नाहीत

काहीही झालं तरी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार नाही असं वाटत होतं, पण…- देवेंद्र फडणवीस

“देवेंद्र फडणवीस यांनी फ्रस्टेशनमधून काही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More