TMKOC मालिका वादाच्या भोवऱ्यात; आश्चर्यकारक कारण आलं समोर

मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah)ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

पण गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. अंजलीली भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहता(Neha Mehta) असो किंवा तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा(Shailesh lodha) असो, या कलाकारांनी मालिका सोडल्यानं चाहते काहीशी नाराज आहेत.

त्यातच आता या मालिकेवरून वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडून कित्येक दिवसांचा कालावधी झाला तरी अजूनही मालिकेच्या निर्मात्यांनी शैलेश लोढा यांचे राहिलेले मानधन दिले नाही.

नेहा मेहताचेही मालिकेच्या निर्मात्यांनी ३०-४० लाख दिले नाहीत. तसेच टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राजा अनादकटचे देखील काही पैसे दिले नाहीत,अशाही चर्चा आहेत.

दरम्यान, मालिका एवढी यशाच्या शिखरावर असताना कलाकारांचे मानधन का रखडले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळं सोशल मीडियावरही याबाबत विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More