पुणे | कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक(Mukta Tilak) यांचं निधन झाल्यानं या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचुकलेंनीही(Abhijeet Bichukale) उमेदवारी अर्ज भरला आहे.
आता बिचुकले यांनी कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा(Kasaba Election) अर्ज भरल्याने त्यांना फोनवरू धमक्या येत असल्याची माहिती स्वत: बिचुकले यांनी दिली आहे. अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा, अशा धमक्या येत असल्याचे बिचुकले यांनी सांगितलं आहे.
आता बिचुकले यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणीही केली आहे. त्यामुळं सध्या बिचुकले सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.
दरम्यान, बिचुकले यांना मंगळवारी पत्रकारांनी कसब्यातील मुख्य प्रश्न कोणते?, असा प्रश्न विचारला. त्यावर बिचुकले संतापले आणि म्हणाले जे निवडूण आलेत त्यांना विचारा, मला प्रश्न माहित नाहीत. जनतेला माहित आहेत. तुम्ही सांगा मग मी सोडवतो, असंही बिचुकले म्हणाले.
मी कसब्याचा उमेदवार आहे, भावी नेता आहे तसेच भावी मुख्यमंत्री आहे. मी तुमच्यावर चिडलो नाही, असंही बिचुकले पत्रकारांना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
- गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर!
- अक्षय कुमार नव्हे तर ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात होती रविना टंडन
- Shraddha Walkar Case | आफताबने श्रद्धाची हाडे मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून त्याची पावडर बनवली?
- अद्भूत! आता अंतराळात तयार होणार मानवी भ्रुण
- सावधान! तुम्ही प्लास्टिकचं तांदूळ खाताय का?; असं ओळखा खरं तांदूळ