बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बकरी ईदनिमित्त कोरोना नियमांमध्ये दिलेल्या सवलती मागे घ्या, अन्यथा…”

मुंबई | सध्या सगळीकडे कोरोना संसर्ग रोगाची दुसरी लाट सुरू आहे. आता कुठं देशातील काही भागात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या हळू-हळू कमी होत आहे. परंतू काही ठिकाणी अजुनही परिस्थिती सुधारलेली नसल्याचं दिसून येत आहे. अशातच केरळ  सरकारने यावर्षीच्या बकरी ईद हा सण साजरा करण्यासाठी काही निर्बंध शिथिल केले आहेत. यावर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने आक्षेप घेतला आहे.

केरळ राज्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच बकरी ईद निमित्त केरळ सरकारने लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये सूट दिली आहे. त्यामुळे सरकारने दिलेली निर्बंधांमधील सूट चिंताजनक असल्याचं मत आयएमआयने व्यक्त केलं आहे.

रविवारी 18 जूलै रोजी आयएमएनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. जारी केलेल्या पत्रकात आयएएमने केरळ सरकारचा हा निर्णय दुर्देवी असल्याचं म्हटलं असून, यामुळे मोठ्याप्रमाणामध्ये लोक एकत्र येतील अशी भीतीही व्यक्त केली आहेत.

देशाचं आणि मानवतेचं भलं व्हावं या मताने तसेच जबाबदारीचं भान राहून आयएमएकडून केरळ सरकारला विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी आपले आदेश मागे घ्यावेत. केरळ सरकारने नियर्ण रद्द करत कोव्हिड अ‍ॅप्रोप्रिएट बिहेव्हियरचं पालन करण्याला चलना दिली नाही आणि करोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासंदर्भातील उपाय केले नाहीत तर, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही आयएमएनं दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुंबईकरांच्या जीवितहानीसाठी बेशरम शिवसेनावाले सोडून बाकी सगळी दुनिया जबाबदार”

“मी जगातील सर्व काश्मीरी नागरिकांचा ब्रँड अॅम्बेसिडर”

“फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा”

“2017 ला मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार होते अन् 2021 मध्ये पाऊस”

“कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More