बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसींच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून ‘या’ पुरवठादाराची माघार; मुंबई महापालिकेच्या अडचणीत वाढ

मुंबई | लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर काढत लस आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मुंबईकरांना लवकरात लवकर कोव्हिड प्रतिबंधक लस देण्यात येईल. एक कोटी लसींचे डोस खरेदी करण्यासाठी 8 पुरवठादार आले होते. त्यातील एक पुरवठादार फायझर कंपनीची अस्ट्रॅझेनेकाची लस पुरवणार होता. मात्र, त्यांनी माघार घेतली आहे. कोणतही कारण न देता फायझर अस्ट्रॅझेनेका कंपनीने ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली आहे. 7 पुरवठादारांबरोबर चर्चा सुरु असून कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी प्रत्येक मुंबईकरांना ऑगस्ट अखेरपर्यंत लसीकरण करण्याचं उद्दीष्ट असल्याचं पालिकेनं सांगितलं आहे.

पालिका अतिरीक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून ग्लोबल टेंडरला प्रतिसाद देणाऱ्या सात कंपन्यांपैकी पाच कंपन्यांशी चर्चा केली आहे. मात्र, अद्याप या कंपन्यांनी ही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. हे सर्व पुरवठादार आहेत. त्यामुळे कंपनीकडून पालिकेच्या गरजेनुसार, त्यांना लस पुरवठा होईल याबाबचे पत्र लस उत्पादकांना सादर करण्याच्या सुचना पालिकेने केल्या आहेत. ही कागदपत्रे सादर करण्यासाठी 1 जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

लस उत्पादक कंपन्यांना लसीच्या वितरणासाठी ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ यांची परवानगी घेणं बंधनकारक आहे. या परवानगीसाठी वेळ लागत असल्यानं निविदांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं मुंबई महापालिकेचं ग्लोबल टेंडर 1 जूनपर्यंत भरता येणार आहे. त्यामुळे आताही अनेक पुरवठादारांनी टेंडर भरता येणार आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेनंतर आता राज्य सरकारनेही 5 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढलं आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि यूएस एफडीएने मंजूर केलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारातील उपलब्ध लसींबाबत हे टेंडर काढण्यात आलं आहे. यासाठी 8 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या

चेन्नई संघाला मोठा धक्का! कर्णधार धोनीचा CSK ला गुडबाय?; भारताच्या माजी खेळाडूचा खुलासा

तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन व्हिडीओ शूट करणाऱ्या पाच नराधमांना अटक!

भारतात कोरोनामुळे 42 लाख मृत्यू झाल्याचा न्यूयॉर्क टाइम्सचा दावा केंद्रानं फेटाळला!

लसीकरण करताना दोन वेगवेगळ्या कंपनीचे डोस घ्यावेत का?; डाॅक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; तुफान हाणामारीत मनसे नेते प्रविण मर्गज जखमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More