बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

24 तासाच्या आत फासा पलटला, ‘तो’ ताज पुन्हा अंबानींच्या डोक्यावर!

नवी दिल्ली | आपल्या देशाला ‘सोने की चिडीया’ असं म्हटलं जात होतं. ‘सोने की चिडीया’ ही उपमा आपल्या देशातील दोन उद्योगपतींना चांगलीच लागू पडत आहे. अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी (Gautam Adani) आणि रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे प्रसिद्ध चेहरे आहेत. परिणामी यांच्या उद्योग साम्राज्याची चर्चा जगभर होत असते.

सध्या शेअर बाजार हा आशियातील सर्वात जास्त श्रीमंताच्या यादीत मोठा फेरबदल निर्माण करत आहे. बुधवारी अदानी ग्रुपचे शेअर वधारल्याचा फायदा गौतम अदानींना झाल्यानं ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले होते. पण शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअर्सनी पुन्हा एकदा उसळी घेतल्यानं मुकेश अंबानी परत एकदा आशिया खंडातील श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

गौतम अदानी हे मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अवघ्या 600 मिलीयन डाॅलरनी मागं आहेत. परिणामी सध्या रिलायन्स आणि अदानी समुहात चांगलीच टक्कर पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती सध्या 89.7 मिलीयन तर अदानी यांची संपत्ती 89.1 मिलीयन आहे. अदानी समुहाचं मार्केटमधील एकुण भाग भांडवल हे 10 ट्रिलीयन तर रिलायन्सचं भाग भांडवल 15.01 ट्रिलीयन डाॅलर इतकं आहे.

दरम्यान, सौदी अरबच्या अरामको या कंपनीसोबत रिलायन्स एक मोठा करार करणार होती. पण करार रद्द झाल्यानं रिलायन्सला फटका बसला आहे. परिणामी सलग तीन दिवस रिलायन्सच्या भाग भांडवलात मोठी घसरण झाली आहे.

थोडक्यात बातम्या 

CBSE माध्यमातून शिकणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबईत परतल्यानंतर परमबीर सिंहांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले…

माझ्या पराभवामागे ‘या’ नेत्याचा हात; मोठं षडयंत्र रचुन मला पाडलं

“वाघावर स्वार होऊन परत पायउतार होणं कठीण, मग वाघच…”

“…तोपर्यंत दाढीतून घरं पडत राहतील, मोदींची दाढी आणि पीएम आवास दोन्ही अमर आहेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More