बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर ती फेसबुक पोस्ट ठरली खरी; मुंबईतील महिला डॉक्टरचं कोरोनाने निधन

मुंबई | कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. सामान्यांपासून अनेक थोर व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. एवढंच काय तर कोरोनामुळे डाॅक्टरांचे देखील मृत्यु झाले आहेत. अशीच एक घटना मुंबई घडली आहे. फेसबुकवर स्वतःच्या मृत्युचं भाकित मांडणाऱ्या एका महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात डॉ. मनिषा जाधव मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. काही दिवसांपुर्वी डॉ. मनिषा जाधव त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच वय 51 वर्ष होतं. त्यानंतर त्यांनी 18 एप्रिलला पहाटे 7 वाजता एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली होती. पण त्यांची ती फेसबुक पोस्ट अखेर खरी ठरली. त्यांचं सोमवारी रात्री मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात निधन झालं.

कदाचित हे माझं शेवटचं गुड मॉर्निंग असेल. कदाचित तुम्हाला या ठिकाणी मी पुन्हा भेटू शकणार नाही. सर्वांनी काळजी घ्या. शरीर मृत पावतं आत्मा नाही, आत्मा अमर आहे, अशी पोस्ट डॉ. मनिषा जाधव यांनी रविवारी सकाळी केली होती. ही पोस्ट पाहून अनेकांनी त्यांना धीर दिला होता. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काहीही होणार नाही, अशा अनेक कमेन्ट्स नेटकऱ्यांनी केल्या होत्या.

दरम्यान, आपण एका चांगल्या डॉक्टरला गमावलं आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे याची आम्हाला जाणीव आहे, असा शोक किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

पाहा पोस्ट-

थोडक्यात बातम्या-

दिवसाढवळ्या झालेल्या गँगवॉरने पुणे हादरलं; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर

‘भिक मागा, चोरी करा पण रुग्णांना ऑक्सिजन द्या’; दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावलं

‘महाराष्ट्राला 500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा व्हावा’; राजेश टोपे यांची मोदींकडे मोठी मागणी

Remdesivir बनवणाऱ्या कंपन्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

खळबळजनक! एकाच रूग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More