मुंबई | जानेवारीमध्ये क्रिकेटर केएल राहुल(KL Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टीनं(Athiya Shetty) लग्नगाठ बांधली. ते लग्नाआधी बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते. त्यामुळं सध्या त्यांचं वैवाहिक जीवन कसं सुरू आहे, हे जाणून घेण्यास त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
नुकत्याच एका मुलाखतीत दोघांना काही प्रश्न विचारण्यात आले. दोघांना विचारण्यात आलं की तुमच्यापैकी कोण चांगला स्वयंपाक करते?, यावर अथिया म्हणाली लाॅकडाऊनमध्ये मी शिकले होते पण सध्या के एल राहुलच चांगला स्वयंपाक बनवतो.
दोघांत पहिल्यांदा साॅरी कोण बोलतं?, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर अथिया म्हणाली, मीच बोलते पहिल्यांदा साॅरी. तुमच्यात मजेदार कोण आहे?, या प्रश्नानंतर दोघांनीही स्वत:कडे बोट दाखवलं.
दोघांपैकी सर्वात जिद्दी कोण?, या प्रश्नावर उत्तर देताना दोघांनी एकमेकांकडं बोट दाखवलं. महत्वाचं म्हणजे केएल राहुल म्हणाला अथियाला संपूर्ण कुटुंब घाबरतं पण अथिया कोणालाच घाबरत नाही.
दरम्यान, अथिया आणि केएल राहुलला त्यांची रिसेप्शन पार्टी कधी होणार आहे?, याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की, रिसेप्शन पार्टी आयपीएलनंतर होईल.
महत्त्वाच्या बातम्या-