बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अभिनेत्रीचा मृत्यू

सांगली | सांगली येथे धक्कादायक घटना घडली आहे. इचलकरंजी येथील नवविवाहीत अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीवरुन आपल्या पतीसोबत घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये संबंधित अभिनेत्रीचा पती गंभीर जखमी झाला आहे.

संबंधित अभिनेत्रीचं नाव पायल सागर बागाडी असं आहे. तर दिग्दर्शक पतीचं नाव सागर बागाडी असं आहे. सागर आणि पायल त्यांच्या मित्राच्या घरी जेवणास गेले होते. एक रात्र तिथं राहिल्यानंतर ते दोघेही सकाळी घरी जात असताना अचानक त्यांची दुचाकी घसरली. यावेळी पायल उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका दगडावर पडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातामध्ये सागर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. सागर आणि पायल यांचा एक महिन्यापुर्वीच प्रेमविवाह झाला होता. दोघेही सिनेसृष्टीशी संबंधित होते. तिथेच त्यांची मैत्री झाली होती. नंतर हीच मैत्री प्रेमात बदलली आणि दोघांनी तीन आठवड्यांपुर्वी नोंदणी पद्धतीने लग्न केलं.

दरम्यान, एका अपघाताने दोघांचा नव्याने थाटलेला संसार उद्धवस्त केला. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सागर यांचा एक हात आणि एक पाय मोडला आहे. सागर यांनी नुकताच एक ‘सैर’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ज्यामध्ये पायल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो”

भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन!

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

‘ए तु थांब रे… मध्ये बोलू नको’; नारायण राणेंनी दरेकरांना झापलं, पाहा व्हिडीओ

पोस्टाची बंपर योजना; सेव्हिंग अकाऊंटवर मिळतंय बँकांपेक्षा जास्त व्याज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More