बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काही सेकंदातच लोखंडी पूल उद्ध्वस्त झाला; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर

धर्मशाळा | हिमाचल प्रदेशमधील किन्नौरमध्ये भूस्खलन झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 9 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर झाल्याची माहिती समोर आली आहे. हे पर्यटक चंदीगडहून हिमाचलमध्ये फिरण्यासाठी आल्याची माहिती आहे.

किन्नौरमध्ये झालेल्या भूस्खलनाची थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत डोंगरावरून मोठ मोठी दगडं खाली पडताना दिसत आहे. तसेच लोखंडी ब्रिज देखील क्षणात उद्ध्वस्त झाल्याचा व्हिडीओमध्ये दिसत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे चमू घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी सरकारकडे हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. किन्नौरचे डीसी आबिद हुसैन सादिक, एसपी एसआर राणा हेही घटनास्थळी दाखल होते.

दरम्यान, या घटनेत मृत्यू झालेल्या पर्यटकांपैकी एक असलेल्या डॉ दीपा शर्मा या सोशल मीडियावर सतत या ट्रिपबाबत अनेक फोटो शेअर करत होत्या. मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीच त्यांनी स्वत: चा एक फोटोही ट्विट केला होता. या फोटो खाली त्यांनी मी भारताच्या शेवटच्या टप्प्यावर उभी आहे, त्यापलीकडे नागरिकांना जाण्याची परवानगी नाही. या ठिकाणाहून सुमारे 80 कि.मी. अंतरावर तिबेटची सीमा असून ती चीनच्या ताब्यात आहे, असं लिहिलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“भास्कर जाधव हे तमाशातील सोगांड्या आणि दशावतारातील शंकासूरच”

“राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका, आम्ही वेटिंगवरच आहोत”

‘बचपन का प्यार’ फेम सहदेवला रॅपर बादशाहकडून मोठी ऑफर!

“नैसर्गिक आपत्ती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकारची रिक्षा पंक्चर”

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More