बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क न घालता फिरणाऱ्या तरूणाचा मुजोरपणा; गाडी न थांबवता पोलिसाला रस्त्यावर फरफटत नेलं

मुंबई | मुंबईत महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाई सुरु आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली आठ ठिकाणी दररोज नाकाबंदी केली जाते. विनाकारण फिरणाऱ्या आणि मास्क न लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.

कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा चौकात बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी औदुंबर म्हस्के त्यांच्या कर्मचारी पथकासोबत कर्तव्य बजावित होते. विनाकारण फिरणारे आणि मास्क न लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरु होती. यादरम्यान विनामास्क फिरत असल्याने पोलीस अधिकारी औदुंबर म्हस्के यांनी त्याची बाईक अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने गाडी न थांबवता पोलिसाला रस्त्यावर फरफटत नेलं. या घटनेत पोलीस अधिकारी म्हस्के गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेत म्हस्के यांच्या डोळ्यासह हातापायाला दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात पोलीस घेऊन गेले. त्याठिकाणी डॉक्टर नसल्याने अन्य खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. मुजोर बाईकस्वार नितीन गायकवाड याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तो वाडेघरचा राहणारा आहे. तो पानटपरी चालक आहे. तो विना मास्क फिरत होता. पोलीस त्याची अँटीजेन टेस्ट करणार आहेत. या भीतीने त्याने पोलीस अधिकाऱ्यास रस्त्यावर फरफटत नेलं.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने पोलिसांकडून ही कारवाई सुरु आहे. मात्र तरीही काही नागरिक नियमांचं पालन करताना तसेच मास्क वापरताना दिसत नाही.

थोडक्यात बातम्या- 

‘…म्हणून मी वडिलांनाच बनवलं होतं बॉयफ्रेंड’; ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने केला मोठा गौप्यस्फोट

…म्हणून एक दोन नाही तर तब्बल 20 रुग्णवाहिका स्मशानभूमीच्या दिशेने रवाना, कारण ऐकून बसेल धक्का

संतापजनक! प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवण्यात अडथळा आणला म्हणून मुलीने आईसोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक; जाणून घ्या एका क्लिकवर

नियतीचा क्रुर डाव! सकाळी वडील, संध्याकाळी आई, तासाभरात अभियंता मुलाचाही मृत्यू 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More