बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुझ्या सेल्फीच्या चरबीमुळे डील फसली’; विजय पगारेंचा धक्कादायक खुलास

मुंबई | आर्यन खान प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. एनसीबीचा पंच प्रभाकर साईलने धक्कादायक खुलासा करत खळबळ उडवून दिली होती. आर्यन खानवर कारवाई होऊ नये यासाठी 25 कोटी रूपयांची खंडणी मागण्यात आली असून त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंकडे जाणार असल्याचा आरोप साईलने केला होता.

या आरोपानंतर आता एनसीबीचा पंच साक्षीदार विजय पगारे यानेही खळबळजनक गौप्यस्फोट केल्याने प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. विजय पगारे याने मुंबई पोलिसांच्या एसआयटीकडे शनिवारी जबाब नोंदवला. त्यानंतर त्याने माध्यमांशी बोलताना या प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड केली आहे.

कॉर्डेलिया क्रुझवरून ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेतल्यावर दुसऱ्याच दिवशी किरण गोसावी आणि आर्यन खानचा सेल्फि व्हायरल होत होता. या व्हायरल झालेल्या सेल्फिमुळेच आर्यनच्या सुटकेसाठी झालेलं डिल बारगळलं असल्याचा दावा विजय पगारेने केला आहे. हे सांगताना पगारेने किरण गोसावी आणि सुनील पाटील यांच्यातील संभाषणाचाही खुलासा केला आहे.

एवढी काय मस्ती आली होती तुला सेल्फी काढायला, तुझ्या सेल्फीमुळे डील फेल झालं. तुझ्यामुळे हातचे 18 कोटी गेल्याचं म्हणत सुनील पाटीलने किरण गोसावीवर ओरडत असल्याचा खुलासा विजय पगारेनं केला. तर सुनील पाटील, मनीष भानुशाली, सॅम डिसूजा यांच्या अनेकदा ड्रग्ज पार्ट्या झाल्या असल्याचा दावाही विजय पगारेने केला आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या जाणून घ्या एका क्लिकवर!

महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात येत्या 24 तासात मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी

मुंबई होतंय कोरोनामुक्त! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

मोठी बातमी! आसाराम बापू एम्स रुग्णालयात दाखल

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर! आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यु नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More