Top News महाराष्ट्र सातारा

‘संतोष पोळने माझ्यासमोर….’; माफीची साक्षीदार ज्योती मांढरेची कोर्टात साक्ष

सातारा |  सिरीअल किलर संतोष पोळने केलेल्या वाई-हत्याकांडाने महाराष्ट्राच नाहीतर देश हादरवून सोडला होता. या हत्याकांडातील  माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने शनिवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी साक्ष दिली आहे.

माझ्यासमोर मंगला जेधे, सलमा शेख, भंडारी यांचा इंजेक्शन देऊन खून केला. या घटनेनंतर त्याने आनंद व्यक्‍त केला. बहुतेक खून हे पोळने सोने आणि पैशाच्या हव्यासापोटी केलं असल्याची साक्ष न्यायालयात ज्योती मांढरे यांनी दिली आहे.

मी पोळच्या संपर्कात येण्यापूर्वीच त्याने तीन खून केले होते तर मी संपर्कात आल्यानंतर मंगला जेधे, सलमा शेख आणि नथमल भंडारी यांचे खून केले असल्याचं ज्योती मांढरे म्हणाल्या.  शनिवारी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी ज्योतीची साक्ष घेतली. त्यानंतर पोळचे वकील श्रीकांत हुडगीकर यांनी उलट तपासणीला सुरुवात केली

दरम्यान, सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशात हादरवणार्‍या वाई-धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून शनिवारी ते न्यायालयात उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

सातारच्या पाटलानं पटवली ‘कश्मीर की कली’; ‘हा’ अडथळा दूर होताच उडवला बार!

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप

शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत- चंद्रकांत पाटी

महाविकासआघाडीतील अंतर्गत पक्षांतरावर छगन भुजबळ म्हणाले

लवकरच भाजपला मोठी गळती, भाजपचे काही आमदार राष्ट्रावादीच्या वाटेवर- नवाब मलिक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या