ऐकावं ते नवलंच! पीएम आवास योजनेचे पैसे मिळताच 11 महिला बॉयफ्रेंडसोबत झाल्या फरार, पती मात्र..

PM Awas Yojana | केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. मात्र, योजनेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आलाय. या आवास योजनेचा गैरवापर काही महिलांनी केला आहे. या आवास योजनेच्या माध्यमातून 11 पुरूषांचे कुटुंब उद्धवस्त झाले आहे.

उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये काही मुली या योजनेतून पैसे मिळाल्यानंतर थेट आपल्या बॉयफ्रेंड बरोबर पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेचा पहिला हप्ता घेऊन 11 महिलांनी (PM Awas Yojana) त्यांच्या बॉयफ्रेंड बरोबर पळ काढला आहे. यामुळे 11 पुरूषांचे कुटुंब उद्धवस्त झाले आहे.

पैसे मिळताच महिला गेल्या बॉयफ्रेंडसोबत पळून

या प्रकरणाची आता एकच चर्चा रंगली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्यानंतर पीडित पती आता पीएम आवास योजनेचा पुढील हप्ता मिळावा, यासाठी सरकारी कार्यालयांच्या चकरा मारत आहेत.

त्यातच अधिकारी त्यांना घरकुल योजनेचा (PM Awas Yojana) पुढचा हप्ता देत नसल्याने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. महाराजगंज जिल्ह्यात ही घटना घडली आहे. जिल्ह्यातील ठुठीहारी, शीतलापूर, चटिया, रामनगर, बकुलडीहा, खेसहरा, किशनपूर आणि मेधोली या गावांतील सुमारे 2 हजार 350 लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता मिळाला आहे.

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील प्रकरणाची चर्चा

यापैकी 11 महिला अशा आहेत, ज्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच 40 हजार रुपये तर घेतले मात्र, पैसे मिळाल्यानंतर त्यांनी थेट प्रियकरासोबत पलायन केलं आहे. पतीला सोडून या महिला फरार झाल्या आहेत.

पीएम आवास योजनेअंतर्गत अशी तरतूद आहे की, जर याचे पैसे इतर ठिकाणी वापरले तर ते पैसे पुन्हा वसूल केले जातात.आता या 11 महिलांकडून पैसे वसूल केले जाणार का?, असाही प्रश्न (PM Awas Yojana) उपस्थित केला जात आहे. दरम्यान, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना या योजनेअंतर्गत पक्की घरं मिळतात. घर बांधण्यासाठी सरकारकडून अडीच लाख रुपयांचं अनुदान दिलं जात. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये या योजनेचा असा वापर करण्यात आल्याने आता याची देशभर चर्चा रंगली आहे.

News Title – Woman absconding with PM Awas Yojana money with boyfriend

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! पुढील तीन दिवस ‘या’ भागात दमदार पाऊस पडण्याची शक्यता

मोठी बातमी! ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव, रूग्णांची संख्या आली समोर

इंडियन बँकेत होतेय तब्बल 1500 पदांसाठी भरती; ‘इथे’ करा अर्ज

‘अशा’ लोकांपासून चार हात दूरच राहा नाहीतर भिकेला लागाल!

पती रणवीर सिंहसमोरच ओरीने दीपिकासोबत केलं असं काही की..; फोटो पाहून चाहते हैराण