Top News

ट्रम्प समर्थकांचा कॅपिटल भवनाबाहेर राडा, गोळीबारात महिलेचा मृत्यू

वॉशिंग्टन | अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप लावला आहे. सोबतच आता ट्रम्प त्यांच्या समर्थकांसोबत मिळून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगसमोर मोठ्यासंख्येने जमा होत राडा घातला. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.

नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडन यांनी ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचं आवाहन केलं आहे.

मी राष्ट्रपती ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावं आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावं, असं बायडन म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘…तर कायमस्वरुपी बंदी आणू’; ट्विटरचा ट्रम्प यांना इशारा

“टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे सापडले”

राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढय़ात मराठी माणसांची एकजूट काय आहे हे दाखवूया- उद्धव ठाकरे

‘या’ भाजप नेत्याची चौकशी होणार; मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या