बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! महिलेच्या गळ्यात अडकली कोरोना चाचणीच्या कीटमधील कांडी, त्यानंतर….

नवी दिल्ली | कोरोना महामारीमुळे जगभरात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. अशातच आता एक धोकादायक बातमी समोर येत आहे. कोरोना टेस्ट करताना एका महिलेला जीव आपला जीव गमवावा लागला.

बिहार राज्यातील पाटना याठिकाणी राहणारी राम बहाद्दूर दार यांची 65 वर्षाची पत्नी जासो देवी या कोरोनाची टेस्ट करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कोरोना टेस्ट तपासणी करता वेळी कोरोना टेस्ट कीटमधील कांडी जासो देवी यांच्या गळ्यात अडकली. या निष्काळजीपणाचा देशातून संताप व्यक्त केला जात आहे.

जासो देवी यांना लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तिच्यावर काहीच उपचार करता आले नाहीत. त्यानंतर जासो देवी अर्धा तास तडफडत राहिली अन् तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत मृत महिलेचे पती राम बहाद्दूर दास यांनी माहिती दिली. तर डॉ. कमलेश कुमार या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणी दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

दरम्यान, कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी नागरिकांनी आपापली काळजी घेणं आवश्यक आहे.  कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.

थोडक्यात बातम्या-

माही मार रहा है! सराव सामन्यातच धोनीने मारले अर्धाडझनभर षटकार, पाहा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीस अन् जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास!

अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचा ‘कॅप्टन’ कोण?; ही 2 नाव आघाडीवर!

…आता तर कोथळा काढायची भाषा वापरली जाते- शरद पवार

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More