अमेरिकेत महिलेची बहादुरी, चोराने गाडी सोडून पळ काढला

वॉशिंग्टन | कार चोरीच्या घटना आपल्याला नवीन नाहीत. मात्र अशावेळी बहादुरी दाखवली तर चोरांनाही पळता भुई थोडी करता येते हे अमेरिकेच्या मिलवाऊकी शहरात घडलेल्या घटनेवरुन समोर आलंय.
 
मेलिस्सा मरियन नावाची महिला पेट्रोलपंपावर गेली होती. यावेळी चोरांनी तिची गाडी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र मेलिस्साने थेट काचेवर उडी घेतली. चोराला काही दिसणार नाही, अशा पद्धतीने ती गाडीवर पडून राहिली. त्यामुळे त्याला गाडी सोडून पळ काढावा लागला.
 
पाहा व्हिडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या