बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून आईने केली पोटच्या पोराची हत्या

नवी दिल्ली | लुभाना येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे रहिवासी असणाऱ्या एका महिलेने स्वतःच्याच पोटच्या पोराची हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येमध्ये तिने आपल्या प्रियकराची मदत घेतली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान महिलेने अत्यंत क्रूरपणे आपल्या लेकाची हत्या केली असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित आरोपी आईचं नाव रूपिंदर कौर असं असून तिचे सुखविंदर सिंह नावाच्या एका व्यक्तीसोबत गेल्या सहा महिन्यांपासून अफेअर सुरू होतं. संबंधित मुलाचं नाव रणदीप सिंह असं आहे. रणदीप सिंह हा विवाहित होता. त्याची पत्नी परदेशात होती. मृत रणदीप सिंह याच्या खात्यात पाच लाख रूपये असून त्याला त्याच्या पत्नीकडे कॅनडाला जायचं होतं. पण त्याच्या आईने गोड बोलून त्याच्याकडून ते पाच लाख स्वत:च्या अकाउंटवर ट्रान्सवर करून घेतले.

पैसे खात्यावर जमा झाल्यावर आई मुलासोबत विचित्र वागू लागली. मुलगा घरात असल्याने ती तिच्या प्रियकराला भेटू शकत नव्हती. या कारणामुळे महिला आणि तिच्या प्रियकराने रणदीपला मार्गातून हटवण्याचा प्लॅन केला. यामध्ये त्यांनी सुखविंदरच्या मित्राची मदत घेतली. आरोपी आईने रणदीपला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर बेशुद्ध असतानाच आरोपींनी त्याच्यावर हातोडे आणि चाकूने सपासप वार करत त्याची हत्या केली. हत्या लपवण्यासाठी आरोपींनी मिळून मृतदेह जाळला.

दरम्यान, गावात रणदीप सिंह गायब असल्याची खबर आगीसारखी परसली होती. पोलीस आरोपी आई रूपिंदर कौरकडे गेले असता त्यांनी तिला ड्रेनेजजवळ एका तरूणाचा मृतदेह सापडला असल्याचं सांगितलं. मृतकाची ओळख पटवण्यासाठी रूपिंदर सिंहला नेण्यात आलं. तेव्हा तिने मुलाचाच मृतदेह ओळखण्यास नकार दिला. मात्र तपास करताना संपुर्ण सत्य समोर आलं.

थोडक्यात बातम्या-

“प्रियांका, कंगणाला भेटणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान”

पुणे हादरलं! फुरसुंगीत कॅनॉलमध्ये एकामागोमाग एक मृतदेह आले वाहत

“बाबा माझे कपडे फाटलेत…”,बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी दीड वर्षांनंतर परिवाराला भेटली

“भाजपने ॲापरेशन लोटसचा कधीच दावा केला नाही, तरी एवढी धास्ती का?”

12 नावांची यादी खरंच भूतांनी पळवली?, राज्यपाल कार्यालयाचं तात्काळ स्पष्टीकरण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More