क्षुल्लक वादातून सासूकडून जावयाची गळा दाबून हत्या

डोंबिवली | सासू आणि जावयाच्या भांडणात गळा दाबल्याने जावयाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सासूला अटक केलीय.

डोंबिवलीतील फुलेनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या रवी सोलंकीचं मुब्र्यातील सोनाबाई वळंदे हिच्याशी लग्न झालं होतं. सोनाबाईला चार महिन्यांपूर्वी जुळी मुलं झाली होती. ती घरी न परतल्याने रवी जुळी मुलं घेऊन गेला होता.

याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी सासू अनिता रवीकडे गेल्या होत्या. यावेळी झालेल्या भांडणात गळा दाबल्याने रवीचा मृत्यू झाला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या