बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिलेची संजय राऊतांविरोधात हायकोर्टात धाव; केले ‘हे’ गंभीर आरोप

मुंबई | शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिनेले गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने संजय राऊतांविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

संजय राऊत यांच्यावर या महिलेने धक्कादायक आरोप केलेत. ते माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी तक्रार करणारा अर्ज शुक्रवारी एका उच्चशिक्षित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला. आपल्या मागे माणसं लावणं, हेरगिरी करणं, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखवणं यासारख्या आरोपांसह विनयभंग केल्याचाही आरोप महिलेनं केला आहे.

सन 2013 मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याविषयी माहिम पोलिस ठाण्यात आणि सन 2018 मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. मात्र पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी संजय राऊत यांचा साधा जबाबही नोंदवला नाही, असं या महिलेने याचिकेत म्हटलं आहे.

मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या या छळवणुकीविषयी गेल्या वर्षी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दाद मागितली. मात्र काही उपयोग झाला नाही, असंही या महिलेनं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पठ्ठ्यानं पेट्रोल पंपावर भरलं डिझेल अन् केलं असं काही की…

6 महिन्यांच्या तीरा कामतला अखेर ‘ते’ 16 कोटींचं औषध मिळालं!

…तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असता का?- उद्धव ठाकरे

भारताच्या पराक्रमी लेकीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ‘या’ पदावर नियुक्ती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More