फलटण हादरलं! उसाच्या शेतात सापडला अर्धवट अवस्थेतील मृतदेह

Retired Officer Suicide

Crime News l फलटणमधील (Phaltan) विडणी (Vidani) येथे उसाच्या शेतात (Sugarcane Field) एका अज्ञात महिलेचा (Unknown Woman) अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना जादूटोण्याचा (Black Magic) प्रकार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी (Police) सुरू केला आहे.

अंधश्रद्धेतून (Superstition) नरबळीचा संशय :

विडणीमधील शेतकरी प्रदीप जाधव (Pradeep Jadhav) यांच्या शेतात या महिलेच्या मृतदेहाचा कंबरेखालचा भाग आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाच्या बाजूला गुलाल, कुंकू, दिव्याची वात, नारळ, काळी बाहुली (Black Doll) अशा वस्तू आढळून आल्या. त्यामुळे अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा अघोरी प्रकार (Heinous Act) असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

विडणी २५ फाटा (Vidani 25 Phata) येथे प्रदीप जाधव यांचे ऊसाचे शेत आहे. या निर्मनुष्य (Desolate) ठिकाणी ४ ते ५ दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने या महिलेची हत्या (Murder) करून तिचा मृतदेह उसाच्या शेतात टाकला असावा, असा संशय आहे.

Crime News l असा उघडकीस आला प्रकार

या महिलेचा कंबरेखालचा भाग असलेला अर्धवट कुजलेल्या (Decomposed) अवस्थेतील मृतदेह एका जंगली प्राण्याने (Wild Animal) उसाच्या शेतातून बाहेर ओढून काढला. हा मृतदेह सर्वात आधी शेतमालक प्रदीप जाधव यांनीच शेताच्या बांधावर पाहिला. त्यांनी तातडीने पोलीस पाटलांना (Police Patil) याबद्दल माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह (Senior Police Officials) तपासासाठी (Investigation) वेगवेगळ्या तुकड्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा (Panchnama) केला. ऊस काढण्यासाठी तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रदीप जाधव पहाटे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला.

या मृतदेहापासून काही अंतरावर नारळ (Coconut), गुलाल, महिलेचे कापलेले केस (Hair), तेलाचा दिवा (Oil Lamp) आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु, ही महिला कोण आहे? तिची हत्या कोणी आणि कशासाठी केली? मृतदेहाचा कंबरेवरील भाग कुठे आहे? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित (Unanswered) आहेत.

पोलीस या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कसून तपास करत आहेत. सध्या संपूर्ण पंचक्रोशीत (surrounding area) या प्रकरणाची जोरदार चर्चा असून वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात आहेत.

Title : Woman’s half-buried body found in Satara, human sacrifice suspected

महत्वाच्या बातम्या- 

‘या’ ठिकाणी कधीही गप्प बसू नका, नाहीतर तुम्ही मूर्ख ठराल

सैफ अली खानच्या हॉस्पिटलचा खर्च समोर, सोशल मीडियावर कागदपत्र व्हायरल

“फडणवीसांनी मुंडेंच्या मैत्रीखातर करुणा शर्माला अनेकदा विमानाने माहेरी सोडलं”

संघाची भाजप मंत्र्यांसाठी ‘पाठशाला’; मोदीनंतर आता संघ देणार कानमंत्र

महाकुंभमधील 95 वर्षीय अघोरी बाबाची धक्कादायक भविष्यवाणी, म्हणाले ‘येणारा काळ हा’

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .