बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिलेचा पती आणि डॉक्टर मित्र; फडणवीसांच्या आरोपावर अजितदादांचं उत्तर

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डॉक्टरांनी रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना औरंगाबादमधील पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रावर घडली आहे. घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून डॉक्‍टरला बेदम मारहाण केली. आता याप्रकरणावर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. ‘तुम्हाला अजून किती बलात्कार आणि किती विनयभंग पाहिजे’, असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना सांगितलं की, तिथे बलात्कार झालेला नाही.  महिलेचा पती आणि संबंधित डॉक्टर मित्र आहेत. हे प्रकरण वेगळं असून महिलेनं कोणतीही तक्रार केलेली नाही. मात्र, डॉक्टरला बडतर्फ करण्यात आलं असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मनपा आयुक्त पांडे यांनी दिले आहेत. संबंधित डाॅक्टर महिलेचा फोन नंबर घेऊन रोज तिला फोन करुन त्रास द्यायचा असा आरोप देखील या महिलेने केला आहे. डाॅक्टरने बुधवारी सुट्टी देण्याच्या नावाखाली या महिलेला केबिनमध्ये बोलावलं आणि शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला.

दरम्यान, महिलेने बदनामीपोटी पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र, महापालिका आयुक्तांना सगळा प्रकार सांगितला आहे. त्यानंतर त्या डाॅक्टरची सेवा संपवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

“ज्यांना जय श्रीराम म्हणायला लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा”

देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा

Renault Kiger गाडीचा बाजारात धुमाकूळ; पहिल्याच दिवशी झाली विक्रमी विक्री

कोरोना पाठोपाठ अमरावतीत ‘या’ आजाराचा शिरकाव!

पोलिसाच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या; उस्मानाबादमध्ये घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More