“आम्ही 2 वर्ष एकत्र होतो, राहुल शेवाळेने धमकावून माझं…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात महिलेवर अन्याय केल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याची चौकशी करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले.

राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राहुल शेवाळेंविरोधातील त्या पीडित महिलेला फेसबुक लाईव्ह करत सगळ्यांसमोर आणलं आहे. यावेली बोलताना या महिलेने शेवाळेंवर गंभीर आरोप केलेत.

28 एप्रिल 2021 ला मी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. माझा जबाब नोंदवला गेला. परंतु आतापर्यंत FIR नोंदवला नाही, असं या महिलेने सांगितलं.

तुम्हाला जनतेने निवडून दिलंय हे माहिती असताना एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केले गेले. धमकावून माझं वारंवार शोषण केले गेले. चांगला माणूस म्हणून सुरुवातीला ओळख केली त्यानंतर खरा चेहरा समोर आला असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा मी कोर्टात हे पुरावे सादर करेन. 10 महिन्यापासून मी लढाई लढतेय. 19 व्या वर्षी मी दुबईला गेली. माझं टेक्सटाईल बिझनेस होतं. माझं करिअर, प्रतिमा सगळं काही राहुल शेवाळे यांनी उद्ध्वस्त केलं, असं या महिलेने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-