बीड | शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शिवसेनेच्यावतीने बीडमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये महिलांनी सहभाग नोंदवला होता आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून चक्क डोक्यावरचे केसही काढले होते.
त्यातल्या स्वाती जाधव यांना शिवसेनेच्या कर्जमाफी आंदोलनाच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून ओळखलं गेलं. त्यावेळेस स्वत: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनीही त्यांचं कौतुक केलं.
मात्र, मुंडन केल्यानंतर जाधव यांना घरातून बाहेर काढण्यात आलं, पतीनं घरातून हाकलून दिलं. माहेरच्यांनीही घरात आसरा दिला नाही. त्यामुळे त्यांना अहमदनगरमध्ये वडापावच्या दुकानावर काम करून उदरनिर्वाह करावा लागतोय.
दरम्यान, ज्या पक्षासाठी घराबाहेर पडण्याची वेळ आली त्या पक्षानेही या महिलांकडे दुर्लक्ष केलं. स्थानिक कार्यकर्त्यांनीही या महिलांची चेष्टा केली. त्यामुळे पक्षासाठी मुंडन केलेल्या महिलाचं जीवन उद्धवस्त झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-… तर तुमचाही दाभोलकर करू; छगन भुजबळांना धमकी!
-देवेंद्रा अजब तुझे सरकार; रात्रीच्या अंधारात मंत्र्याची दुष्काळ पाहणी
-निवड समितीकडून महेंद्रसिंग धोनीला निवृत्तीचा सल्ला?
-मोदी सरकारची नवीन जाहिरात पाहिली का?
-माझ्या घरातील महिलांशी चुकीचं वागण्याचं धाडस कोणी करु शकत नाही!
Comments are closed.