बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्रीवादळातही प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिली महिला, पाहा व्हिडीओ

मुंबई | तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. मुंबई आणि किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. समुद्रानं रौद्र रुप धारण केलेलं पाहायला मिळतंय. एकूणच समुद्राच्या लाटा उंच उसळत आहेत. समुद्र किनाऱ्यांपासून लांब तसेच घरातच राहण्याचं आवाहान प्रशासन आणि हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर #CycloneTauktae शी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओज शेअर केले जात आहे. यामध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका महिला सफाई कामगाराचा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक महिला पावसात रस्त्यावर कचरा काढत आहे. यादरम्यान महिलेने डोकं पॉलिथिनने कव्हर केलं आहे. महिला मात्र भिजत असताना आपलं काम करत आहे. महिला कसलाही विचार न करता चक्रीवादळातही अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम करीत आहे.

या महिलेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. व्यावसायिक आनंद महिंद्रा यांनी देखील या महिलेचं कौतुक केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनी प्रेरणादायी असल्याचं म्हटलंय. मला हे माहीत आहे की, @mybmc यांना रेनकोट उपलब्ध करून देतात. मात्र तरीही त्यांनी पुन्हा एकदा याची खात्री करून घ्यावी, असं आनंद महिंद्रा म्हणाले.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“सतत केंद्राकडं बोट दाखवण्याची सवय सोडा, राज्य सरकारने असं वागणं बर नाही”

मरीन ड्राईव्हवर समुद्राचं रौद्र रुप; अंगावर काटा अणणारा व्हिडीओ समोर

मिरगीचा झटका येऊन बेशुद्ध पडलेल्या नवरदेवाला शुद्ध येताच धू-धू धुतलं; कारण वाचून व्हाल अवाक्

शाब्बास पुणेकरांनो! आज बाधितांचा आकडा हजाराच्या आत तर…; वाचा आजची आकडेवारी

…अन् वरातीतील पाहुण्यानंच नवरीसोबत घेतले सात फेरे!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More