टी-20 विश्वचषकामध्ये आज भारताचा मुकाबला पाकिस्तानशी, कोण जिंकणार?

AP Photo/Aijaz Rahi

मुंबई | महिला टी-20 विश्वचषक सामन्यात भारताचा सामना आज पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. मागील सामन्यामध्ये न्यूझीलंडचा 34 धावांनी पराभव केल्याने संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय कर्णधार हरमणप्रीत कौरने दमदार खेळी करत 51 चेंडूंत 103 धावांची वादळी खेळी केली होती. त्यामुळे भारताने 195 धावांपर्यत मजल मारली होती.

टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघ बलाढ्य मानला जात नाही. मात्र, गेल्या तीन सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे.

भारतीय संघाने आजपर्यंत एकही टी-20 विश्वचषक जिंकलेला नाही. मात्र, भारतीय संघाचा सध्याचा फाॅर्म पाहता संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अवनीला गोळ्या घालण्याचे आदेश सुधीर मुनगंटीवारांनी दिले नव्हते!

-राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘संघ दक्ष’; 25 नोव्हेंबरला पहिली हुंकार रॅली

-सोशल मीडियावर #JusticeForAvni ; सरकार आणि मुनगंटीवार आरोपीच्या पिंजऱ्यात

-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल

-अयोध्येतील राम मंदिर उभारणीत सर्वात मोठा अडथळा काँग्रेसच!