बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनमध्ये घरातच पोल डान्स करायला गेली महिला अन्…; पाहा हास्यास्पद व्हिडिओ

नवी दिल्ली | लॉकडाऊन काळामध्ये घरबसल्या लोक अनेक नवनवीन प्रयोग करत असताना पाहायला मिळत आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊन व्हिडिओ बनवत असल्याचं दिसून येत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एक महिला आपल्या घरामध्ये पोल उभा करून पोल डान्स करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पोल डान्स करत असताना त्या महिलेसोबत जे झालं ते पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. बहुतांश महिलांना नृत्याची मोठ्याप्रमाणात आवड असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच या पोल डान्स करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्याने एकच धुमाकूळ घातला आहे.

डान्सची आवड असलेली ही महिला आपल्या घरामध्येच पोल डान्स करत असताना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. पण अचानक ती पोलवर चढते आणि तो पोल घरात असलेल्या टेबलवर पडतो आणि तिची मोठी फजिती होते. मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी याला शेअर देखील केलं आहे.

ही महिला नेमकी कुठली आहे हे अद्याप समजू शकलेलं नसलं तरी तिचा पोल डान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, या घटनेमध्ये ती महिला किरकोळ जखमी झाली आहे. हा हास्यास्पद आणि गमतीशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

पाहा व्हिडिओ

थोडक्यात बातम्या –

आता 15 मिनिटात कोरोना रिपोर्ट; ‘या’ कंपनीनं तयार केली 100 रूपयांची कोरोना चाचणी किट

पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण; मागच्या आठवड्यातच घेतली होती लस

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 93 टक्यांवर

“कोणतीच व्हॅक्सिन शंभर टक्के संरक्षण करू शकत नाही”

कपल रोमान्स करताना होणाऱ्या आवाजाने शेजारी वैतागला, केलं असं काही की….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More